आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सणांत फायदा: आयपीओकडून भरभरून परतावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेअर बाजारात नव्याने दाखल झालेल्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला आहे. आता तीन आयपीओ ३० सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर रोजी बंद होणार आहेत.

स्नोमॅन लॉजिस्टिक्सनंतर शारदा क्रॉपकॅमने आयपीओ गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शारदा क्रॉपकॅमची बाजारात जोरदार लिस्टिंग दिसून आली. मुंबई शेअर बाजारात शारदा क्रॉपकॅमच्या समभागांची ६० टक्के प्रीमियमवर लिस्टिंग झाली. तिस-या दिवशीही हा समभाग ६७ टक्के रिटर्नसह २६१ रुपयांवर बंद झाला. हा समभाग १५६ रुपयांना मिळाला होता.
शारदा क्रॉपकॅमचे सीएमडी रामप्रकाश व्ही. बुबना यांच्या मते, आर्थिक वर्ष २०१५ मध्ये नफ्यात ३० टक्के आणि उत्पन्नात २५ ते ३० टक्के वाढीची अपेक्षा आहे. ज्या किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ९० समभागांचा लॉट मिळाला त्यांना पहिल्याच दिवशी कमाल पातळीवर ७६ टक्के परतावा मिळाला.

नव्या आयपीओकडे ओढा
गुरुवारी बाजारात तीन आयपीओ दाखल झाले. आर्यमन कॅपिटलचा आयपीओ १२ रुपयांच्या प्राइस ब्रँडवर २५ सप्टेंबरला उघडला असून तो एक ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे, तर मोमाई अ‍ॅपेरल्सचा आयपीओ २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर चालणार आहे. अतिशय इन्फोटेकचा आयपीओ गुरुवारी दाखल झाला असून तो २९ सप्टेंबर रोजी बंद होईल. नवा आयपीओ आणण्यासाठी आता नियम आणखी कडक झाले आहेत.

कंपनी प्राइस ब्रँड खुला बंद
आर्यमन कॅपिटल मार्केट्स १२ रु. २५ सप्टें. १ ऑक्टो.
मोमाई अ‍ॅपेरल्स ७८-९० रु. २५ सप्टें. ३० सप्टें.
अतिशय इन्फोटेक १६ रु. २५ सप्टें. २९ सप्टें.