नवी दिल्ली- 'टाटा मोटर्स' आणि कारझोनरेंटने दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांसाठी एक खास स्कीम लॉन्च केली आहे. या स्कीमच्या माध्यमातून एका दिवसासाठी कार भाड्याने मिळेल. यासाठी प्रति दिवस फक्त 399 रुपये भाडे मोजावे लागेल. जर एका तासासाठी कार भाड्याने घ्यायची असेल तर त्यासाठी 99 रुपये प्रति तासाप्रमाणेही भाडे मोजावे लागणार आहे.
टाटा कंपनीतर्फे या स्क्रीमसाठी जवळपास 200 कार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात 'नॅनो ट्विस्ट' कारचा समावेश असेल.
एका महिन्यासाठीही भाड्याने घेऊ शकता कार...
एका महिन्यासाठीही कार भाड्याने घेता येते. 6,999 रुपये प्रति महिना भाडे भरून ग्राहक कार घरी नेता येईल. .
कारझोनरेंटचे एमडी आणि सीईओ राजीव विज यांनी सांगितले की, 'माइल्स (सेल्फ ड्राइव्ह)सिटी ड्राइव्ह योजना'द्वारा कार भाड्याने दिल्या जातात. यासाठी दिल्लीत 43 सेंटर सुरु करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन बुकिंगची देखील सुविधा उपलब्ध आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 'मर्सडीज'ही मिळेल भाड्याने...