आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get This Month PF Account Transfer Online Facility

पीएफ खाते ट्रान्सफर ऑनलाइन सुविधा या महिन्यापासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) भविष्य निधी न्यासाअंतर्गत येणा-या संघटित क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी भविष्य निर्वाह निधी खात्यांच्या हस्तांतरणासाठी ऑनलाइन सुविधा या महिन्यापासून सुरू करणार आहे. ज्या कंपन्या आपल्या कर्मचा-यांसाठी सेवानिवृत्ती कोशाचे व्यवस्थापन करतात, अशा कंपन्यांत प्रथम ही सुविधा सुरू होईल.

कामगार मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले, ईपीएफओने खासगी भविष्य निधी न्यास आणि ईपीएफओशी सरळ जोडणी असलेल्या कंपन्यांत आपसात भविष्य निर्वाह निधी खात्यांच्या ऑनलाइन ट्रान्सफरची सुविधा या महिन्यापासून सुरू करण्याची योजना आखली आहे. सध्या ही सुविधा केवळ ईपीएफओशी सरळ जोडणी असलेल्या कंपन्यांच्या त्या कर्मचा-यांना मिळते, ज्यांच्याकडे भविष्य निधी न्यास नाही आणि त्या कंपन्या आपल्या पीएफचे व्यवस्थापन संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत करतात. ही सुविधा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली होती.