आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब... साडे दहा लाखांची सायकल, 22 गिअर आणि 70 Kmph चा स्‍पीड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- ग्‍लोबल बाइक मेकर 'जाएन्ट' लवकरच भारतीय बाजारात 10.6 लाख रुपये किमतीची सायकल लॉन्च करणार आहे. 'प्रोपेल अॅडव्हान्स एसएल 0' असे या मॉडेलचे नाव आहे. 'प्रोपेल अॅडव्हान्स एसएल 0' ही जगात सगळ्यात वेगात धावणारी सायकल असल्याचे दावा 'जायन्ट'ने केला आहे. इलेक्‍ट्रॉनिक गिअर तंत्रज्ञानावर ही सायकल आधारीत असून तिला एकूण 22 गिअर आहेत. एका तासात ही सायकल 70 किलोमीटर अंतर कापते.

'प्रोपेल अॅडव्हान्स एसएल 0'चे वैशिष्ट्ये म्हणजे सायकलची फ्रेम कार्बन फायबरपासून बनवलेली आहे. या फ्रेमचा फॉर्म्‍युला 'वन रेसिंग' आणि 'बोइंग'च्या ड्रीमलाइनर विमानात उपयोगात आणला जातो.

'प्रोपेल अॅडव्हान्स एसएल 0'लाचे पार्ट्‍स तैवान येथून इम्‍पोर्ट केले जाणार असून 'स्‍टारकेन स्‍पोर्ट्स'द्वारा असेंबल करून भारतीय बाजारात विक्री केली जाणार आहे. 'जाएन्ट' कंपनीचे पुणे आणि बंगळुरुमध्ये स्‍टोअर्स आहे. यंदा दिल्‍ली आणि मुंबईतही स्टोअर्स उघडण्‍याची योजना कंपनीने केली आहे. याशिवाय आगामी आर्थिक वर्षांत हैदराबाद, अहमदाबादमध्ये स्‍टोअर्स सुरु केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे ही सायकल ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असेल.

दिल्लीतील 'ऑटो एक्‍स्‍पो'मध्ये सगळ्यात आधी 'प्रोपेल अॅडव्हान्स एसएल 0' सादर करण्‍यात आली होती. त्यानंतर या सायकलला प्रचंड प्रतिसाद मिळाला तसेच दिवसेंदिवस या सायकलची मागणी वाढत असल्याचे 'जाएन्ट स्‍टारकेन'चे एमडी प्रवीण पाटील यांनी सांगितले आहे.

पुढील स्‍लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, एका अन्‍य सायकलचे फोटोज आणि स्‍पेसिफ‍िकेशन....
(फोटो: प्रोपेल अॅडव्हॉन्स एसएल 0)