आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन स्क्रीन जोडताच फोटो ट्रान्सफर होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोबाइल हँडसेट बाजारपेठेतील वाढती स्पर्धा पाहता सर्वच कंपन्या सरस उत्पादने आणण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये जिओनी स्मार्टफोन्स कंपनीने मॅराथॉन एम-३ लाँच केला आहे. या हँडसेटचे वैशिष्ट्य म्हणजे दोन फोनचे स्क्रीन एकमेकांना जोडताच छायाचित्र आणि व्हिडिओ दुसर्‍या हँडसेटमध्ये स्थलांतरित होतील.

ही सुविधा "हॉट नॉट फीचर'मधून मिळेल, असे जिओनी इंडियाचे प्रमुख अरविंद व्होरा यांनी सांगितले. याशिवाय हँडसेटमध्ये ओटीजी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे बॅटरी कमी झाली तरी फोन ऐकता येईल. साधारण ३३.७ तासांचा टॉकटाइम आणि ३२.८ दिवसांच्या स्टँडबाय या तंत्रज्ञानामुळे बॅटरी देते. हँडसेटची किंमत १२,९९९ रुपये असेल. यामध्ये ८ जीबी इंटरनल मेमरी, ८.० एमपी बॅक कॅमेराही आहे.