आवाज बदलून बोलण्यासाठी / आवाज बदलून बोलण्यासाठी भन्नाट Voice Changer

दिव्य मराठी नेटवर्क

Mar 14,2014 12:45:00 PM IST

एखाद्याला मिमिक्री करताना पाहून आपणही अशा प्रकारे आवाज बदलून बोलावे असे आपल्याला अनेक वेळा वाटत असते. काही लोकांना मुलगी आणि मुलगा अशा दोन्ही आवाजात बोलता येते. तुम्हालाही अशा प्रकारे आवाज बदलून बोलण्याची आवड असेल तर आता ते सहज शक्य आहे. यासाठी गुगल प्लेवर एक स्मार्टफोन अ‍ॅप उपलब्ध आहे. 'गर्ल्स व्हाइस चेंजर' नावाचे या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा आवाज वेगवेगळ्या आवाजात बदलू शकता.


कोणत्या प्रकारचे आवाज तयार करता येतात
- लहान मुलीचा
- 3 वर्षावर्यंतच्या मुलांचा
- 10 वर्षांपर्यंतच्या मुलीचा आवाज
- 16 वर्षाच्या मुलीचा आवाज
- 21 वर्षाच्या मुलाचा आवाज
- 35 वर्षाच्या महिलेचा आवाज
- वृद्ध महिलेचा आवाज
- हाय-पिच टोन
- लो- पिच टोन

गूगल प्लेवर हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे. गूगल प्लेवर आतापर्यंत या अ‍ॅपला 858 लोकांनी रेटींग दिले आहे. याला 5 पैकी 4.0 स्टार मिळाले आहेत. आतापर्यंत 50,000 लोकांनी हे अ‍ॅप इंस्टॉल केले आहे. हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसमध्ये अ‍ॅन्ड्राइड 2.2 किंवा त्या पुढची ऑपरेटिंग सिस्टम असणे गरजचे आहे.

X
COMMENT