आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Home Loan On Construction; Reserve Bank Order

जितके बांधकाम, तितकेच गृहकर्ज द्या; रिझर्व्ह बँकेचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गृहकर्ज एकरकमी न देता ते घराच्या किंवा फ्लॅटच्या बांधकामाच्या टप्प्यांप्रमाणे द्या, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकांना दिले. विक्रेत्यांचे हितसंबंध आणि नव्या युक्त्यांसह बाजारात येणार्‍या गृहवित्त पुरवठा योजनांना आळा बसावा या हेतूने आरबीआयने हे निर्देश दिले. अपूर्ण तसेच बांधकाम सुरू असलेल्या व ग्रीनफील्ड गृहप्रकल्पातील घर किंवा घरांसाठी एकरकमी कर्जाची रक्कम न देण्याचे निर्देशही बँकेने दिले.

गृहकर्जाची रक्कम एकरकमी ग्राहकांच्या हाती देण्यात जोखीम आहे. म्हणून व्यक्तिगत कर्जदाराला बांधकामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्यात कर्ज द्यावे. कर्जाची अग्रिम रक्कम एकरकमी हाती देऊ नये. काही बँकांनी बिल्डर व विकासकांच्या संगनमताने अनेक कर्ज योजना बाजारात आणल्या आहेत. 80:20 किंवा 75:25 या नावाच्या योजनांत ईएमआयचा वापर बिल्डरांच्या भल्यासाठी होत असल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले आहे. यातून थकबाकी वाढून कर्जदार व बँका अडचणीत येत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी आरबीआयने हे निर्देश दिले आहेत.


लोन टू व्हॅल्यू दरात बदल
बँकेने किती कर्ज द्यावे हे ठरवणारा दर म्हणजे ऋण मूल्य (लोन टू व्हॅल्यू - एलटीव्ही). 21 जूनपासून बदलेत्या दरानुसार 20 लाखांपर्यंत गृहकर्जासाठी बँकांना 90 टक्के कर्ज देता येईल. 10 टक्के रक्कम कर्जदाराने उभारायची आहे, तर 20 लाख ते 75 लाखांच्या कर्जासाठी या दराचे गुणोत्तर 80 :20 असे असून 75 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जासाठी हे प्रमाण 75 : 25 असे करण्यात आले आहे.