आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GMAILने आणले FACEBOOK सारखे फिचर, पाठवणा-याला समजणार कधी उघडला मेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता GMAILवरही फेसबुकसारखे एक फिचर येणार आहे. फेसबुकवर चाट करताना तुम्ही मॅसेज सेंड केल्यावर तो समोरच्या व्यक्तीने कधी पहिला हे तुम्हाला कळते त्याचप्रमाणे आता GMAILवरही मेल पाठवणा-याला समोरच्या व्यक्तीने मेल कधी ओपन केला ते समजेल. सन फ्रांसिसकोमधील एका फर्मने मेल ट्रॅक करण्यासाठी एक नवीन स्ट्रीक प्लगइन तयार केले आहे.
स्ट्रीक प्लगइनच्या मदतीने आकाउंट होल्डरवर लक्ष ठेवता येते. पाठवलेल्या मेलपैकी किती मेल कोणी आणि कधी उघडले हे पाहता येईल. मेल किती वेळा आणि कोणत्या डिव्हाइसवर पाहिला आहे हे ही या तंत्रज्ञानाच्या मदतीने पाहता येईल. एवढेच नाही तर कोठे मेल उघडला आहे ते ठिकाणही जाणून घेता येईल.
स्ट्रीक प्लगइन सेल्स आणि मार्केटिंग प्रोफेशनलसाठी तयार करण्यात आले आहे. GOOGLE CROME , GMAIL आणि सफारी युजर्स प्लगइन डाउनलोड करू शकतात.
तुम्ही प्लगइन इंस्टॉल केल्यानंतर लगेचच ई-मेल ट्रॅकिंग सुरू होईल. इन-बॉक्समध्ये एखादा मेल आल्यानंतर लगेचच तो ट्रॅक होईल.
तुम्ही ई-मेल वाचला, की पाठवणा-याला स्क्रिनच्या खालच्या भागातील पॉपअप विंडोमध्ये सूचना मिळेल. तुम्ही मेल केव्हा, कुठे आणि कोणत्या डिव्हाइसवर वाचला आहे हे मेल पाठवणा-याला कळेल.
इनबॉक्समधील उजव्या साइडला असणा-या आयकॉनवर एक हिरवा लाइट लागेल ज्यात ई-मेल किती वेळा वाचला हे समजेल.
ई-मेल उघडल्यानंतर त्याच्यासोबत अ‍ॅटॅज असणारे डॉक्युमेंट डाउनलोड करण्यास युजरने सुरूवात केल्यावर पाठवणा-याला त्याचा आयपी अ‍ॅड्रेस मिळेल. ज्याच्यावरून युजरचे लोकेशन माहिती करता येईल.