आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- फर्निचर क्षेत्रातील आघाडीची कंपनी गोदरेज बॉयसने सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत सेलफोन, संगणकाचा वापर वाढल्याने त्यातून निर्माण होणा-या स्नायू आणि मणक्याचे विकार टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून बहुराष्ट्रीय उद्योगात जागरूकता मोहीम आणि कार्यशाळा भरविण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या या कार्याचा एचपीसीएल, सिमेन्स, फोक्सवॅगन या उद्योगांना चांगलाच फायदा मिळत असल्याची माहिती कंपनीचे जीवन शैलीविषयक तज्ञ पराग शास्त्री यांनी पत्रकारांना दिली.
कंपनीच्या वतीने तरुणांपासून ते वृध्द व्यक्तीने कोणत्या प्रकारचे फर्निचर वापरावे याविषयी सल्ला देण्यासाठी पुण्यात प्रथमच एका डॉक्टरची नेमणूक करण्यात आली आहे. ते म्हणाले की, कंपनीच्या शोरुम मध्ये एर्गो मीटर ठेवण्यात आला आहे. तुम्हाला काम करताना किंवा आराम करताना कोणत्या पद्धतीची बैठक व्यवस्था आरोग्यपूरक आहे याचे पर्याय वजन, उंची, पोटाचा, कमरेचा घेर याची तपासणी करून सांगितला जातो. त्याचा फायदा होत असून मान आणि स्नायू दुखीचे प्रकार कमी होत आहेत. आज सेलफोन, टॅब वापरण्याचे प्रमाण वाढत असल्याने कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेचा संकोच होतो आहे. याचा अतिरिक्त ताण मणक्यावर येऊन कर्मचा-यांचा कामाचा उत्साह कमी होतो. तसेच तो घरी गेल्यावर कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. कामाचे स्वरूप लक्षात घेऊन बैठक व्यवस्था बदलणे हाच त्यावरील उपाय आहे. खासगी कंपन्यात वर्क स्टेशनपाशी काम करण्यास सोयीची ठरणारी 'एस' ही नव्या प्रकारची खुर्ची हे कर्मचारी प्रतिसादातून मिळालेल्या माहितीनंतर विकसित झाली आहे.
कंपनीने मिळालेल्या प्रतिसादानंतर आयटी कंपनीपासून ते विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे फर्निचर हवे त्यानुसार उत्पादनात बदल करून ती बाजारात उपलब्ध केली आहेत. कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत वापरण्यासाठी खास प्रकारच्या खुर्च्या वेगळा ब्रॅंड वापरून बाजारात आणल्याचेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.