आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Godrej Interio Launches Remote Relax Chair For Old Age People

गोदरेज इंटेरिओने विकसित केली खास वृद्धांसाठी रिमोटवर चालणारी आरामखुर्ची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे: गोदरेज इंटेरिओ येत्या दोन वर्षात पुण्याजवळील शिरवळ कारखान्यात आणखी 50 कोटी रुपये गुंतवणार असून ही उलाढाल 100 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपये होईल, अशी माहिती उपाध्यक्ष सुबोध मेहता यांनी दिली. महाराष्ट्रात पुणे मुंबई वगळता विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया तसेच मराठवाड्यातील नांदेड, लातूर या शहरातून उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळतोय. त्‍याचबरोबर ग्राहकांच्‍या गरजा लक्षात घेऊन कंपनीने वृद्धांसाठी रिमोटवर चालणारी आरामखुर्ची आणि डायनिंग टेबल विकसित केले आहे.

सध्या असलेल्या मंदीमुळे सरासरी विक्री 35 वरून 25 टक्के झाली असली तरी ग्रामीण भागातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढत असल्याने त्याचा फायदा कंपनीला मिळतो आहे. मेहता म्‍हणाले, कार्यालय आणि घरासाठी असलेल्या फर्निचरची 90 टक्के बाजारपेठ असंघटित क्षेत्रात आहे. असे असूनही संघटित क्षेत्राची उलाढाल दहा हजार कोटी रुपये आहे. यावरून विक्री वाढीस किती वाव आहे हे लक्षात येते. लाकडाला पर्याय म्हणून पर्यायी धातू वापरून फर्निचर निर्मिती सुरु केली आहे असेही त्यांनी नमूद केले.

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने परदेशी बनावटीचे फर्निचर आयात करणे परवडेनासे झाले आहे, त्यामुळे हा वर्ग गोदरेजच्‍या उत्पादनाकडे वळेल अशी अपेक्षा आहे. 2016-17पर्यंत उलाढाल 5,000 कोटी रुपये होईल असा अंदाज आहे.

घरांची अंतर्गत सजावट बदलण्यास केवळ कंपनीच्या फेसबुक पेजवर क्लिक करावे लागणार असून त्यात भाग्यवान ग्राहकांन निशुल्क सजावट करून दिली जाणार आहे