आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Godrej Refrigeter, Washing Machine Price Increase From 1 July

गोदरेजचे फ्रिज, वॉशिंग मशीनची नवी दरवाढ एक जुलैपासून लागू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरसमोर वारंवार लोटांगणे घालणा-या रुपयाने सध्या कंपन्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. उत्पादन खर्चात वाढ आणि नफ्यावर ताण येत असल्याने काही मोटार कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनीदेखील त्याच पावलावर पाऊल टाकले आहे. गोदरेज अप्लायन्सेसने आपल्या गृहोपयोगी वस्तूंच्या किमती एक जुलैपासून तीन ते पाच टक्क्यांच्या दरम्यान वाढवल्या आहेत.


ही किंमतवाढ सर्वच उत्पादनांना लागू होणार असल्याचे कंपनीचे विक्री आणि विपणन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले. या किंमतवाढीनंतर कंपनी एसी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन्स आणि मायक्रोवेव्ह या उत्पादनांची विक्री साधारणपणे 4,790 ते 44,800 रुपये या श्रेणीत करीत आहे. आयात होेणा-या सुट्या भागाच्या किमतीवर ही वाढ अवलंबून असेल, असेही ते म्हणाले. गोदरेज अप्लायन्सेसची उलाढाल 2,500 कोटी रुपयांची असून कंपनी जाहिरात आणि प्रचारावर त्यापैकी पाच टक्के खर्च करते.