आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 800, चांदी 2 हजारांनी घसरली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ औरंगाबाद - अमेरिका फेडरल रिझर्व्हने आर्थिक मदतीचा हात आखडता घेण्याचे संकेत दिल्यानंतर सोने तसेच चांदीच्या किमती घसरल्या. गुरुवारी मुंबई सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 775 रुपयांनी घसरून 27,295 झाले. चांदी किलोमागे 1935 रुपयांनी घटून 43,115 रुपये झाली. औरंगाबादेत सोन्याची किंमत तोळ्यामागे 800 रुपयांनी घसरून 27,800 रुपयांवर आली. चांदी 2000 रुपयांनी स्वस्त होऊन 44,000 रुपये किलो झाली. रुपयातील नीचांकी घसरण तसेच शेअर बाजार आपटल्याने सोने तसेच चांदीच्या किमती उतरल्याचे सराफांनी सांगितले.


डॉलरच्या तुलनेत रुपया ‘साठी’त!
मुंबई/नवी दिल्ली । भारतीय रुपया गुरुवारी डॉलरच्या तुलनेत प्रचंड घसरला. एक वेळ तर त्याने साठी गाठली. नंतर मात्र 87 पैशांनी घसरून 59.57 रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला. मार्चपासून डॉलरच्या तुलनेत आतापर्यंत रुपयाची 15 टक्के घरसण झाली आहे. याच्या परिणामी इंधन तेलासह सर्वच आयातीवरील खर्च वाढेल. याचा फटका थेट जनतेला बसेल.
परदेशातील दौरे तसेच तेथे राहण्याचा खर्च आता 15 ते 20 टक्के वाढेल. म्हणून परदेशात सुट्यांची मौज लुटण्यासाठी जाणा-या 77 टक्के पर्यटकांनी सध्या हात आवरता घेतला आहे. शिवाय, परदेशी ब्रँडची खरेदी करण्याची हौस असणा-यांनी रुपयाच्या ‘साठी’ची आता चांगलीच धास्ती घेतली आहे. रुपयाच्या विक्रमी अवमूल्यनाचा परिणाम कॉम्प्युटर, फ्रिज, मोबाईल, वॉशिंग मशीन या घरगुती उपकरणांच्या किमतींवरही याचा परिणाम दिसू लागेल.