आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने झळाळले, चांदी चकाकली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगातील बाजारातील सकारात्मक कल आणि स्टॉकिस्टांकडून झालेली खरेदी यामुळे सोने व चांदी या मौल्यवान धातूच्या किमती वधारल्या. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 75 रुपयांनी वाढून 27,425 रुपये झाले. चांदीच्या किमतीत किलोमागे 380 रुपयांनी वाढ होऊन 44,500 वर स्थिरावल्या. जागतिक बाजारातील कल आणि स्टॉकिस्टकडून झालेल्या खरेदीमुळे सोन्यात पुन्हा तेजीचा कल दिसून येत असल्याचे सराफांनी सांगितले. लंडन बाजारात सोने औंसमागे 0.8 टक्के वधारून 1398.55 डॉलर झाले. चांदी औंसमागे 0.9 टक्के चकाकून 22.48 डॉलर झाली. घसरणारा रुपया आणि शेअर बाजारातील घसरण यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळल्याचे संकेत असल्याचे निरीक्षण सराफांनी नोंदवले.