आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने, चांदी चकाकले; दोन दिवसांच्या घसरणीनंतर सराफ्यात तेजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आगामी सणांच्या हंगामामुळे ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून मौल्यवान धातूला शनिवारी चांगली मागणी आली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे 250 रुपयांनी वाढून 28,350 झाले. औद्योगिक क्षेत्राकडून चांगली मागणी आल्याने चांदीही चकाकली. किलोमागे चांदी 400 रुपयांनी वाढून 44,800 झाली.

सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, जागतिक सराफा बाजारातही सोन्याबाबत सकारात्मक कल दिसून आला. त्यातच देशातील सराफ्यात सोन्याला चांगली मागणी आली. आता देशात विविध सणांचा हंगाम, र्शावण महिना सुरू होत असल्याने सोने आणि चांदीची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. परिणामी सोने व चांदीच्या किमती तेजीत राहतील.