आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोने-चांदी घसरले, रुपयाला मूल्यवाढीची तरतरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तीन सत्रांत झळाळत्या तेजीने चमकलेल्या सोन्याच्या किमती मंगळवारी घसरल्या. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 160 रुपयांनी घसरून 28,625 झाले. जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक कल आणि मागणीत घट झाल्याचा फटका सोन्याला बसला. चांदीवरही विक्रीचा दबाव दिसून आला. चांदी किलोमागे 100 रुपयांनी स्वस्त होऊन 44,700 झाली. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, ज्वेलर्सकडून सोने आणि चांदीची मागणी घटल्याने सोन्यावर दबाब आला. सिंगापूर सराफ्यात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 0.3 टक्क्याने घटून 1313.98 डॉलर झाले.

कच्चे तेल घसरले : इराकमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढतील अशी धास्ती बाजाराला होती. मात्र, मंगळवारी कच्चे तेल घसरले. यूएस बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट 54 सेंटने घसरून 105.63 डॉलर प्रति बॅरल झाले, तर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती बॅरलमागे 63 सेंटने घसरून 113.69 डॉलरवर आल्या. त्यामुळे बाजाराला दिलासा मिळाला.

रुपयाला तरतरी : दोन दिवस डॉलरकडून मार खाणार्‍या रुपयाला मंगळवारी मूल्यवाढीची तरतरी आली. कच्चे तेल घसरल्याने रुपया वधारला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सात पैशांनी वाढून 60.13 झाले. फॉरेक्स डीलर्सनी सांगितले, निर्यातदारांकडून डॉलरची विक्री झाल्याने रुपयाला बळ मिळाले.