आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold And Silver Rate Down News In Marathi, Business

सोने, चांदी स्वस्त; रूपया सावरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्टॉकिस्टांनी केलेली विक्री आणि जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक कल याचा फटका मंगळवारी मौल्यवान धातूंच्या किमतींना बसला. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे 275 रुपयांनी स्वस्त होऊन 28,200 झाले. चांदी किलोमागे 200 रुपयांनी घटून 45,200 झाली.

नीचांकावरून रुपया सावरला : निर्यातदारांकडून मोठी मागणी आल्याने मंगळवारी रुपयाचे मूल्य वधारले. डॉलरच्या तुलनेत एक महिन्याच्या नीचांकावर असणार्‍या रुपयाने 6 पैशांची कमाई करत 60.24 पर्यंत मजल मारली.