आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नसराईमुळे सोने, चांदी चकाकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लग्नसराईमुळे बुधवारी सोन्याला चांगली मागणी आल्याने सोने चकाकले. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 50 रुपयांनी वाढून 30,750 झाले. चांदी किलोमागे 100 रुपयांनी वधारून 42,800 झाली. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक कल आणि देशात सुरू असलेली लग्नसराई यामुळे स्टॉकिस्ट आणि ज्वेलर्सकडून सोन्याची सातत्यपूर्ण खरेदी यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला चांगली मागणी आल्याचा फायदा चांदीला झाला.
लंडन सराफा बाजारात सोने औंसामागे 0.4 टक्क्यांनी चकाकून 1313.58 डॉलर झाले, तर चांदी औंसमागे 0.6 टक्क्यांनी वाढून 19.71 डॉलरवर पोहोचली. या आठवड्यात लग्नसराईमुळे ज्वेलर्सकडून सोने आणि चांदीला चांगली मागणी आहे. सोन्याच्या मागणीत सातत्यपूर्ण वाढ होत असल्याने या आठवड्यात दोन दिवसांत सोने तोळ्यामागे 70 रुपयांनी महागले आहे.
रुपया घसरून 60.13 वर : डॉलरच्या तुलनेत मागील दोन सत्रांत चांगली कामगिरी करणार्‍या रुपयाच्या मूल्यात घसरण झाली. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया दोन पैशांनी घसरून 60.13 वर स्थिरावला.