सोने, चांदी चकाकले; / सोने, चांदी चकाकले; मौल्यवान धातूंना तेजीने चकाकी

Apr 04,2014 02:11:00 AM IST

नवी दिल्ली- गेल्या चार सत्रांत घसरणीने काळवंडलेल्या मौल्यवान धातूंना गुरुवारच्या तेजीने चकाकी आली. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 100 रुपयांनी वाढून 29,350 झाले. चांदी किलोमागे 530 रुपयांनी वाढून 43,930 झाली. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, जागतिक सराफा बाजारात सोने सात आठवड्यांच्या नीचांकी पातळीत होते. तेथे जोरदार खरेदीमुळे सोन्याची चमक वाढली. त्याचा परिणाम स्थानिक सराफा बाजारात दिसून आला. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 0.3 टक्क्यांनी वाढून 1293.36 डॉलर झाले. देशातील सराफा बाजारात मागील चार सत्रात सोने तोळ्यामागे 105 रुपयांनी घसरले होते.

X