आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने झळाळले, चांदी चकाकली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई - शुक्रवारी 23 महिन्यांचा नीचांक गाठणारे सोने शनिवारी तेजीने झळाळले. चांदीनेही सोन्याप्रमाणे उसळी घेत चकाकी दाखवली. सटोडिया आणि गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे दोन्ही धातूत तेजी दिसली. राजधानी सराफ्यात सोने तोळ्यामागे 780 रुपयांनी वाढून 26,430 वर पोहोचले. चांदी किलोमागे 1990 रुपयांनी वधारून 41,000 वर स्थिरावली. मुंबई सराफा बाजारात यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. मुंबईत सोन्याच्या किमती तोळ्यामागे 645 रुपयांनी वाढून 25,910 वर पोहोचले. चांदीही किलोमागे 1020 रुपयांनी चकाकली व 41,210 वर स्थिरावली.
आंतरराष्ट्रीय बाजारातही या दोन्ही मौल्यवान धातूंनी तेजीचा धडाका दाखवला. न्यूयॉर्क बाजारात सोने औंसमागे 2.87 टक्क्यांनी वधारून 1235.30 डॉलर झाले. चांदीने 6.21 टक्क्यांच्या उसळीसह औंसाला 19.66 डॉलरची पातळी गाठली. देशातील सराफ्यात गेल्या पाच सत्रात सोन्याच्या किमतीत 7.41 टक्के घसरण झाली होती. याच काळात सोने तोळ्यामागे 2010 रुपयांनी स्वस्त झाले होते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आर्थिक मदतीचा हात आखडता घेण्याचे संकेत दिल्याने सोने घसरत आहे. शनिवारी खालच्या पातळीवर आलेल्या मोठ्या मागणीमुळे सोन्याने उसळी घेतल्याचे सराफांनी सांगितले.