आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Coin Available In Indian Post Office 7 Percent Discount

इंडिया पोस्टमध्ये सोन्याच्या नाण्यांवर 7 टक्के खास सूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अक्षय्य तृतीयेनिमित्त इंडिया पोस्टमध्ये सोन्याच्या नाण्यांवर ग्राहकांना 7 टक्क्यांपर्यंतची सवलत मिळणार आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्यूजीसी) सांगितले की, देशातील 970 पोस्ट ऑफिसेसमध्ये सोन्याच्या नाण्यांवर 7 टक्के सवलत देण्यासाठी इंडिया पोस्ट आणि रिलायन्स मनीसोबत करार करण्यात आला आहे. ही सवलत 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

डब्ल्यूजीसीने सांगितले की, करारांतर्गत स्विसनिर्मित 1, 5, 8, 10, 20 आणि 50 ग्रॅमची 99.9 टक्के शुद्धतेची नाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. डब्ल्यूजीसीचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम म्हणाले, 13 मे रोजी देशात अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होत आहे. सोन्याच्या खरेदीसाठी हा मुहूर्त सर्वात शुभ म्हणून समजला जातो. करारांतर्गत ग्राहकांना 24 कॅरेटच्या सोन्याच्या नाण्यांवर 7 टक्के विशेष सवलत दिली जाईल. इंडिया पोस्ट ऑफिसच्या मुख्य व्यवस्थापक कल्पना तिवारी यांनी सांगितले, ग्राहकांना एकूण मूल्यावर 7 टक्के सवलत दिली जाईल.