आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची लगड, नाणे विक्री सराफांनी थांबवली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोने खरेदीचा मोह टाळा, अशी विनंती करतानाच या मौल्यवान धातूच्या चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी विविध उपाययोजनादेखील केंद्र सरकार करीत आहे. सरकारच्या या प्रयत्नांना आणखी बळकटी देण्यासाठी ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने सोने आणि सोन्याच्या नाण्यांची ग्राहक तसेच कंपन्यांना विक्री करणे थांबवावे, अशी सूचना सराफा व्यावसायिकांना दिल्या आहेत. या संस्थेने देशभरातील स्थानिक ज्वेलर्स असोसिएशन्स आणि त्यांच्या सदस्यांसोबत चर्चा करण्यासाठी विविध बैठका घेतल्या होत्या. चालू खात्यातील वाढत्या तुटीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर देशातील सर्व सराफ व्यावसायिकांनी ग्राहकांकडून सोने आणि नाणी यांच्या ऑर्डर्स घेणे आणि त्यांची विक्री थांबवण्यात यावी, अशी विनंती केली. हा उपक्रम 6 महिन्यांपर्यंत किंवा कॅडविषयक संकट टळेपर्यंत तसाच सुरू राहणार आहे. निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने सरकारने काही प्राथमिक बदल करणे अपेक्षित असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष हरेश सोनी यांनी व्यक्त केले.


रोजगारासाठी प्रयत्न : या उपक्रमाला सराफा व्यावसायिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून 65 टक्क्यांहून अधिक व्यापा-यांनी मौल्यवान परकीय चलन वाचवण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक ते सहकार्य देण्याचे मान्य केले आहे. परंतु, दागिने विक्री आणि मौल्यवान खडे व दागिने निर्मिती क्षेत्रातून मिळणा-या रोजगाराला यामुळे कोणतीही झळ बसणार नाही या दृष्टीने संघटना केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याचे सोनी यांनी स्पष्ट केले.