आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणासुदीच्या हंगामात सोन्याची मागणी 15 टक्क्यांनी वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यंदा झालेला चांगला पाऊस, त्याचबरोबर सणासुदीच्या हंगामात 20 टक्क्यांपेक्षा जास्त पवित्र दिवस येत असल्यामुळे सोन्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन ती 300 टनांवर जाण्याचा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने व्यक्त केला आहे.


यंदाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सोन्याच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याचे संकेत असून ही मागणी 250 ते 300 टनांपर्यंत जाण्याचा अंदाज परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक पी.आर. सोमसुंदरम यांनी व्यक्त केला आहे.
साधारणपणे दसरा, दिवाळी वा अन्य पवित्र दिवशी सोन्याची खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. यंदाच्या वर्षातील सणासुदीच्या काळात मागील वर्षाच्या तुलनेत अशा प्रकारचे पवित्र दिवस 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. त्याचप्रमाणे चांगल्या पावसाचाही सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरची तिमाही फारशी चांगली गेली नसली तरी सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता सोमसुंदरम यांनी व्यक्त केली. सोन्याच्या किमती सध्या वाजवी पातळीवर असल्यानेही त्याचा सोन्याच्या मागणीवर सकारात्मक परिणाम होणार आहे.


मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहीत देशातील पिवळ्या मौल्यवान धातूची मागणी 260.3 टन तर संपूर्ण वर्षात ती 863 टन होती. यंदाच्या वर्षात ही मागणी 900 ते 1000 टनांवर जाण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.