आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्ड ईटीएफच्या निधीला गळती; सोने योजनांची मालमत्ता 12 हजार कोटींच्या खाली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सलग सात महिने गोल्ड ईटीएफ योजनांमध्ये भरभरून गुंतवणूक केल्यानंतर आता मात्र या योजनांमधील निधीला गळती लागली आहे. गुंतवणूकदारांनी अन्य मालमत्ता वर्ग तसेच समभागांमध्ये केलेल्या नफारूपी कमाईमुळे गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडातून यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात मोठय़ा प्रमाणावर निधी काढून घेण्यात आला आहे. गोल्ड ईटीएफ योजनांमधून केवळ 8 कोटी रुपये इतकी कमी रक्कम जरी बाहेर गेलेली असली, तरी या योजनांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता फेब्रुवारी महिन्यात 12 हजार कोटी रुपयांच्या खाली गेली आहे.

'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस' अर्थात 'अँम्फी'ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या जानेवारी ते गेल्या महिन्यापर्यंत पहिल्यांदाच गोल्ड ईटीएफ योजनांमधून निधी बाहेर गेला आहे. या फंडातून 227 कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला आहे. गेल्या वर्षातील जुलै ते यंदाच्या जानेवारी महिन्यापर्यंतच्या कालावधीत म्हणजे सलग सात महिन्यांमध्ये 'गोल्ड ईटीएफ'मध्ये 1 हजार 733 कोटी रुपयांचा निधी आला. यंदा सोन्याच्या किमतीत 2.5 टक्क्यांनी घट झाली आहे.

जानेवारीत उच्चांक- केवळ गोल्ड ईटीएफच नाही, तर अन्य ईटीएफ योजनांतून गेल्या महिन्यात 119 कोटींचा निधी बाहेर गेला. त्या उलट जानेवारी महिन्यात या योजनांमध्ये 3 कोटी रुपयांचा निव्वळ निधी आला होता. अन्य ईटीएफ योजनांची मालमत्ता घसरून ती जानेवारीतल्या 1,692 कोटीवरून फेब्रुवारीत 1,506 कोटींवर आली आहे. फंडाची एकूण मालमत्ता जानेवारीतील उच्चांकी पातळीवरून फेब्रुवारी महिन्यात 1.5 टक्क्यांनी घसरून ती 8.14 लाख कोटी रुपयांवर आली आहे.