आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यावरील मर्जी उतरली! गोल्ड ईटीएफमधून निघाले 230 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अडचणीच्या घडीस हमखास नफा मिळवून देणा-या सोन्यावरूनही गुंतवणूकदारांचा विश्वास डगमगला आहे. सोन्यातून पैसे काढून निश्चित कमाई देणा-या इतर पर्यायांत (फिक्स्ड इन्कम टूल्स) गुंतवणूक होत आहे.
एकट्या जून महिन्यात गोल्ड ईटीएफ होल्डिंगमध्ये सुमारे 2.5 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत सोन्यातील गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ हा सर्वात्तम पर्याय म्हणून समजला जात होता. गोल्ड ईटीएफमध्ये सोन्याच्या किमतीव्यतिरिक्त घडणावळ शुल्क नसते. थोडक्यात ही सोन्यातील गुंतवणूक कागदोपत्री असते. यात गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा मिळू शकतो. मात्र गेल्या सहा महिन्यांत सोन्याने फक्त 7 टक्क्यांचाच नफा करून दिला आहे.
शेअर बाजारच फायद्यात- शेअर बाजाराने यावर्षी गुंतवणूकदारांचा 14 टक्क्यांनी फायदा करवून दिला आहे. मात्र शेअर बाजारावर गुंतवणूकदारांचा विश्वास कमी कमी होत चालला आहे.
प्रॉपर्टी बाजार महागडाच- बँक कर्ज महाग होत चालले आहे. यामुळे गुंतवणूकदार आता सोन्यात गुंतवलेला पैसा मोकळा करत आहेत.