नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील संकेत उत्साहवर्धक असतानाही शुक्रवारी मागणीअभावी सोने स्थिर राहिले. चांदी मात्र मागणीमुळे चकाकली. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 28,400 रुपयांवर स्थिर राहील, तर चांदी किलोमागे 400 रुपयांनी वाढून 45,300 झाली.
सराफा व्यापार्यांनी सांगितले, लग्नसराई सरल्याने सोने तसेच चांदीची मागणी कमी झाली आहे. परिणामी जगातील बहुतेक सराफा बाजारांत सोने चकाकत असताना देशात मात्र मागणीअभावी सोने स्थिर राहिले. याउलट औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला चांगली मागणी आल्याने चांदीच्या किमती वधारल्या. गुरुवारीही चांदीच्या किमतीत किलोमागे 100 रुपयांची वाढ झाली होती.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)