आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची उसळी, चांदीही चकाकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक कल आणि लग्नसराईमुळे मौल्यवान धातूंना आलेली मोठी मागणी यामुळे बुधवारी सोने-चांदीच्या किमती उसळल्या. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ६५० रुपयांनी उसळून २७,४७० वर पोहोचले. औद्योगिक क्षेत्रातून आलेल्या मागणीमुळे चांदी किलोमागे १६०० रुपयांनी चकाकून ३८,४०० झाली.

सराफा व्यापा-यांनी सांगितले, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले. तसेच लग्नसराईमुळे ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांच्याकडून सोन्याला चांगली मागणी आल्याने सोन्याच्या किमती उसळल्या. न्यूयॉर्क सराफा बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) २८ डॉलरने वधारून १२३८.३२ डॉलर झाले. हा सहा आठवड्यांचा उच्चांक आहे.

रुपयाची बासष्टी
डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपयाचे अवमूल्यन झाले. आयातदारांकडून डॉलरला मोठी मागणी आली. परिणामी डॉलरच्या तुलनेत रुपया १४ पैशांनी घसरून ६२.०२ पर्यंत खाली आला. हा रुपयाचा एक आठवड्याचा नीचांक आहे.