आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Import Increases, Government Policy Wait And Watch

वाढती सोने आयात, सरकारची थांबा आणि वाट पाहा भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोन्याच्या आयातीमध्ये झालेली सहापट वाढ नक्कीच चिंताजनक असली तरी सरकारने सध्या तरी थांबा आणि वाट पाहा धोरण स्वीकारले असून योग्य वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वाणिज्य सचिव राजीव खेर यांनी सांगितले. सोने आयातीमध्ये सहापटींनी वाढ झाली आहे. अगदी काही दिवस अगोदरच धोरणाचा फेरआढावा घेतला. सरकारने थांबा आणि वाट पाहा धोरण स्वीकारले आहे; परंतु गरज भासल्यास योग्य ती पावले उचलली जातील, असे खेर म्हणाले.
मुंबईतील ‘इंडिया इंजिनिअरिंग सोर्सिंग शो’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तीन दिवस चालणा-या या मेळाव्यात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या जागतिक पातळीवरील ३०० कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या सोने आयातवाढीचे काय परिणाम होतात यावर सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत थांबा आणि वाट पाहा धोरण अवलंबले असल्याचे वाणिज्य सचिवांनी या वेळी सांगितले. स्थानिक सराफ उद्योगाच्या मागणीनंतर आता ‘८०:२०’ योजना शिथिल करण्यात आली आहे.