आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या आयातीला पुन्हा वेसण घालणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोन्याची आयात पुन्हा वाढल्यामुळे सरकारसमोर नवीन चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या काहीशी नियंत्रणात असलेली चालू खात्यातील तूट पुन्हा वाढू नये यासाठी केंद्र सरकार सोन्याच्या आयातीवर काही निर्बंध आणण्याचा विचार करत आहे. अर्थ मंत्रालयाने त्याबाबत उपाययोजना सुरू केल्या असून एक ते दोन दिवसांत त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या वाढत्या आयातीवर चर्चा करण्यासाठी सरकारची गेल्याच आठवड्यात बैठक झाली होती. आयतीला वेसण घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्यावरील आयात शुल्क दहा टक्क्यांवर आणून सोने आयातीवर कडक निर्बंध घातले.

सोन्याची सद्यस्थिती
ऑक्टोबरमधील सोने आयात : ४.१७ अब्ज डॉलर (अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील १.०९ अब्ज डॉलरच्या तुलनेत चौपट जास्त.)
>मूल्य स्वरूपात सोने आयात : १५० टन ( २४ टन)
>सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे ऑक्टोबरमध्ये फुगलेली व्यापार तूट : १३.५५ अब्ज डॉलर (१०.५९ अब्ज)