आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Jewellery News In Marathi, Export, Divya Marathi

देशातील सोने दागिने निर्यातीत वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील सोन्याच्या दागिन्यांची निर्यात फेब्रुवारी महिन्यात एक टक्क्याने वाढून ती अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 18.36 अब्ज डॉलरवर गेली असल्याचे हिरे आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने म्हटले आहे.
गेल्या वर्षाच्या एप्रिलपासूनच्या पहिल्या अकरा महिन्यांमध्ये 6.35 अब्ज डॉलरची सोन्याच्या दागिन्यांची निर्यात झाली आहे. त्याअगोदरच्या याच कालावधीतील 11.67 अब्ज डॉलरच्या तुलनेत या निर्यातीमध्ये घट झाली असल्याचे परिषदेने नमूद केले आहे.


चालू खात्यातील फुगलेली तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. तेलानंतर देशात सोन्याची मोठी आयात केली जाते आणि त्याचाही दागिने निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.