आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्ड लोन कंपन्यांच्या विस्तारावर सोनेरी अंकुश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - यंदाच्या पहिल्या तिमाहीत 30 हजारांच्या पातळीवर चकाकणार्‍या सोन्याची झळाळी जूनमध्ये चांगलीच उतरली. त्यामुळे सोने तारण कर्ज देणार्‍या कंपन्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोन्याच्या किमती घसरल्याने कंपन्यांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण घटले आहे. ग्राहकांनी
या कंपन्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सोने तारण कर्ज देणार्‍या कंपन्यांना
आपल्या विस्तार योजना सध्या बासनात ठेवणे पसंत केले आहे.
सोने तारण कर्ज क्षेत्रातील काही कंपन्यांनी नव्या शाखा उघडण्याचे बेत लांबणीवर टाकले आहेत, तर काही कंपन्यांनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मणप्पुरम फायनान्सच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, सध्याचा काळ कारभारासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि परीक्षा घेणारा आहे. साधारण
परिस्थितीत सोने तारणावर
कर्ज देण्याचा व्यवहार 20 टक्के दराने वाढतो. यंदा या दराने वाढ होणे अशक्य आहे. कारण सोन्याच्या किमती सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे यंदा नवी शाखा उघडण्याचा विचार नाही. सध्या मणप्पुरमच्या देशभरात 3000 शाखा आहेत.
मुथूट फायनान्सच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, 2013-14 या आर्थिक वर्षात वर्षात कंपनीने 250 ते 300 शाखा उघडण्याची तयारी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीने 400 नव्या शाखा उघडल्या होत्या. भांडवलाचे मूल्य घसरण्याच्या बाबतीत लोन -ट्रू-व्हॅल्यूचे (एलटीव्ही) प्रमाण जास्त राहते. यात जोखीम जास्त असते. जोपर्यंत सोन्याच्या किमती तेजीत असतात तेव्हा हे मुद्दे गौण ठरतात. मात्र, जेव्हा
किमती घसरतात तेव्हा अडचणी येतात. सोन्याच्या किमती उतरल्याने ग्राहकांची त्यातील रुची कमी होते, ज्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या ग्राहकांवर होतो.
मणप्पुरमच्या ग्राहकांत गेल्या तिमाहीत घट झाली आहे. डिसेंबर 2012 मध्ये कंपनीकडे 10.55 लाख ग्राहक होते. यंदाच्या मार्चमध्ये ही संख्या घटून 10.52 लाख झाली. मार्च 2012 मध्ये कंपनीकडे 10.62 लाख ग्राहक होते.

स्थिती काय ?
सोन्याच्या किमती उतरल्याने ग्राहकांची त्यातील रुची कमी होते, ज्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या ग्राहकांवर होतो.
ग्राहक घटले
मणप्पुरमच्या ग्राहकांत गेल्या काही तिमाहीत घट झाली आहे. डिसेंबर 2012 मध्ये कंपनीकडे 10.55 लाख ग्राहक होते. यंदाच्या मार्चमध्ये ही संख्या घटून 10.52 लाख झाली. मार्च 2012 मध्ये कंपनीकडे 10.62 लाख ग्राहक होते.