आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर: सोने खरेदीला सोनेरी दिवस; तोळ्यामागे 800 रुपयांची घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली, मुंबई, औरंगाबाद- भारतीय रिझर्व्ह बँकेने सोने आयातीच्या नियमात शिथिलता आणल्याने गुरुवारी देशातील सराफा बाजारात सोने स्वस्त झाले. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 800 रुपयांनी घसरून 28,550 झाले. या घसरणीचे पडसाद स्थानिक सराफा बाजारातही उमटले. औरंगाबादेत सोने तोळ्यामागे 800 रुपयांनी स्वस्त होऊन 28,200 वर आले. यंदाच्या वर्षातील ही आतापर्यंत सर्वात मोठी घसरण आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात आलेल्या या घसरणीमुळे सोन्याने नऊ महिन्यांची नीचांकी पातळी गाठली आहे. चालू खात्यातील तूट नियंत्रणात आणण्यासाठी काँग्रेसप्रणीत पुरोगामी लोकशाही आघाडीच्या (यूपीए) सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वेळोवेळी वाढवून 2 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर नेले. रिझर्व्ह बँकेनेही बँका तसेच आयातदारांवर अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळे जानेवारी ते मार्च 14 या तिमाहीत सोन्याची आयात 26 टक्क्यांनी घटल्याचा अहवाल जागतिक सुवर्ण परिषदेने दिला आहे. सोने आयातीला चालना मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बुधवारी रात्री उशिरा सोने आयातीवरील निर्बंध शिथिल केले. त्यामुळे गुरुवारी देशातील सराफ्यात सोने गडगडले.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, दिलासा असा...