आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold News In Marathi, Business, Divya Marathi, Akshay Tritay, Festivel

अक्षय्य तृतीयेला सोने घसरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोने खरेदीच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोने स्वस्तात खरेदीची संधी ग्राहकांनी शुक्रवारी साधली. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 195 रुपयांनी घसरून 30,390 झाले. अक्षय्य तृतीयेची मुहूर्ताची खरेदी सोन्याच्या किमतीला झळाळी देऊ शकली नसल्याचे सराफा व्यापा-यांनी सांगितले.

औद्योगिक क्षेत्राकडून मागणी घटल्याने चांदीची चमकही फिकी पडली. चांदी किलोमागे 430 रुपयांनी स्वस्त होऊन 41,650 झाली. चांदीच्या किमतीत सलग तिस-या सत्रांत घसरण दिसून आली.
सराफा व्यापा-यांनी सांगितले, अमेरिका फेडरल रिझर्व्हकडून रोखे कपात व तेथील अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत मिळाल्याचा परिणाम जागतिक सराफा बाजारात दिसून आला. सिंगापूर सराफ्यात सोने औंसमागे 0.2 टक्क्यांनी घटून 1282.25 डॉलर झाले.

औरंगाबादेत चांगला प्रतिसाद
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मुहूर्तावर सोने खरेदीसाठी औरंगाबादेत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दत्ता सावंत सराफ यांनी सांगितले. मुहूर्ताच्या दिवशी सोने 30,400 रुपये तोळा याप्रमाणे विक्री झाल्याचे सांगून सावंत म्हणाले, शुद्ध सोने खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिसून आला. शुद्ध सोन्याच्या लगडी, वळी, नाणी व अंगठ्या खरेदीवर ग्राहकांनी भर दिल्याचे त्यांनी सांगितले.