आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपु-या पावसामुळे ग्रामीण भागात सोन्याची चमक फ‍िकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अपु-या पावसामुळे घरगुती बचतीवर विपरीत परिणाम झाला असून त्यामुळे ग्रामीण भागातील सोन्याची मागणी घटण्याचा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने व्यक्त केला आहे.
सणासुदीच्या, विशेषकरून दिवाळीच्या हंगामात सोन्याची मागणी चांगली राहण्याची शक्यता व्यक्त करतानाच परिषदेने सरकारी निर्बंध येऊनदेखील प्रदीर्घ काळात सोन्याची मागणी तशीच कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सून पुन्हा एकदा पूर्ववत पातळीवर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी ग्रामीण भागातील बचतीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे या भागात सोन्याची मागणी फार राहणार नाही, असे परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम यांनी असोचेमने आयाेजित परिसंवादात सांगितले. ग्रामीण भागातील सात ते आठ टक्के बचत सोने खरेदीकडे वळते. चांगले पीक आल्यास शेतक-यांची आर्थिक िस्थती चांगली होऊन सोने खरेदी जोरात होते, असेही ते म्हणाले.