आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक सराफा बाजारातील मागणीअभावी सोने घसरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक वातावरण आणि मागणीअभावी सोने घसरले. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 625 रुपयांनी स्वस्त होऊन 31,100 झाले. चांदीच्या किमती किलोमागे 54,300 रुपयांवर स्थिर राहिल्या. सराफा बाजाराचे लक्ष आता अमेरिका फेडरल रिझर्व्हच्या संकेताकडे लागले आहे. देशातील सराफा वाजारात उच्च पातळीत असलेल्या सोन्याच्या किमतीमुळे मागणीत घट झाल्याचे चित्र आहे.


अमेरिका फेडरल रिझर्व्ह आता कर्जरोखे खरेदीत घट करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सोने-चांदीचे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यातच देशातील सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातू उच्च पातळीवर आहेत. मागणी नसल्याने सोने तसेच चांदीच्या किमतीला फटका बसत असल्याचे दिल्लीतील सराफा व्यापा-यांनी सांगितले. लंडन सराफा बाजारात सोने औंसमागे 0.3 टक्क्यांनी घसरून 1387.24 डॉलर झाले. चांदीच्या किमती औंसमागे 0.3 टक्क्यांनी घटून 23.78 डॉलर झाल्या. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आर्थिक मदतीचा हात आखडता घेतल्यास सोने-चांदीतील गुंतवणुकीला गळती लागू शकते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.