आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 3 वर्षांच्या नीचांकावर, दिल्लीत तोळ्यामागे ४५० रुपयांची घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील नरमाई, देशातील ज्वेलर्स, रिटेलर्सकडून घटलेली मागणी याचा फटका बुधवारी सोन्याच्या किमतीला बसला. राजधीनीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे ४५० रुपयांनी घसरुन २५,९०० झाले. ही सोन्याचा तीन वर्षांचा नीचांक आहे. औद्योगिक क्षेत्रातून घटलेल्या मागणीमुळे चांदीच्या किमती आणखी घसरल्या. चांदी किलोमागे ९०० रुपयांनी घसरून ३५,०५० झाली.

सराफा व्यापा-यांनी सांगितले, जागतिक बाजारात डॉलर वधारल्याचा दबाब सोन्याच्या किमतीवर दिसून आला. त्यातच देशातील ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून मागणी घटल्याने सोन्याची झळाळी आणखी कमी झाली. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) १.९० टक्क्यांनी घटून ११४६.३४ डॉलर झाली.