आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी पडझड संभ्रम आणि वास्तविकता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शतकानुशतके सर्वसामान्यांना सोन्याबद्दल विशेष आकर्षण राहिलेले आहे. अगदी सोन्याचा शोध लागल्यापासून ते आजपर्यंत सोन्याचा मोह कधीही कमी झाला नाही. सोन्यात असलेले विशेष गुण, त्याची चकाकी आणि त्याकरिता झालेले अनेक संघर्ष यामुळे तर त्याबद्दलची उत्सुकता नेहमी कायम राहिलेली आहे आणि वाढतच गेली आहे. नोटांचं प्रचलन ही मानवी सभ्यतेची गेल्या 100 वर्षांची देणगी आहे. त्याआधी नाणी वापरात होती, पण वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे, व्यापाराच्या भौगोलिक सीमा वाढल्यामुळे नाण्यांच्या वापरात मर्यादा आल्या आणि कागदी नोटांचं चलन वाढलं. 1७ व्या आणि 1८ व्या शतकात ब्रिटन, तर 1९ व्या शतकापासून अमेरिकेने जागतिक अर्थव्यवस्थेवर आपला ठसा उमटवला. त्यामुळे अमेरिकन डॉलर ही सर्व आंतरराष्‍ट्रीय अर्थव्यवस्थेची चलनमुद्रा झाली. सुरुवातीच्या काळात अमेरिकन (यूएस) डॉलरचा भाव सोन्याच्या किमतीवर आधारित होता. अर्थात सोन्याला जितकं महत्त्व होतं किवा आर्थिक व्यवहारात सोन्यावर जितका विश्वास होता तोच विश्वास यूएस डॉलरवर होता.


ब्रिटन वुड्स सिस्टिम कार्यपद्धती दुसरं महायुद्ध संपत असताना तयार झाली. पण 1९७1 मध्ये अमेरिकन राष्ट्रपती निक्सनने एकाएकी ही व्यवस्था संपुष्टात आणली. पण यामुळे मात्र जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या भावामध्ये बरेच बदल झाले. नंतर सर्व देशांनी आपल्या चलनमुद्रेला यूएस डॉलरसोबत जोडलं होतं आणि त्यामुळे एखाद्या देशाच्या चलनाच्या विनिमय दरात बदल झाल्यास त्या देशात सोन्याच्या किमतीत पण मोठे बदल होऊ लागले.


सध्या सोन्याच्या दरात कमालीची घट होत आहे. प्रतितोळा 24 हजार रुपये (दहा ग्रॅम) सोने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोन्याच्या दरात घट होत असल्याने गुंतवणूक करणा-यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. जसे की सोन्याची घटती किंमत कितीवर स्थिर होईल ? की ही फक्त सुरुवात असून अजून किमती खाली जातील ?
बँक ऑफ अमेरिका, मॅरिल लिंच यांनी स्पष्ट केलंय की, सोन्याच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. बँक तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत घट झाली तर भारतातही सोन्याची किंमत प्रतितोळा 24 हजार रुपये इतक्या खाली येईल. सोन्याच्या किमतीत अचानक घट आलेली नाही. यासाठी बराच वेळ लागला आहे आणि तो अजून जाण्याची शक्यता आहे.

किमती घसरण्याची प्रमुख कारणे
* अमेरिकेत आर्थिक सुधारणा
अमेरिकेतील अर्थव्यवस्था सहा-सात महिन्यांत सुधारून मंदी ओसरत आहे. गुंतवणूक परत सोन्यातून शेअर मार्केटमध्ये जात आहे. डॉलरचे इतर मुद्रेच्या तुलनेत मूल्यांकन वाढत आहे व त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झालाय.
* सायप्रस विकणार
14 टन सोने
आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी सायप्रस 14 टन सोने विकणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 100 डॉलरने खाली आला. युरोपमधील सेंट्रल बँक सोने विकणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली. युरोपातील अन्य देशांनीही सोने विकण्याची घोषणा केली.
* आंतरराष्‍ट्रीय
स्थिती प्रतिकूल
आंतरराष्‍ट्रीय प्रतिकूल स्थिती सोन्याच्या किमतीसाठी जबाबदार आहे. म्हणजे सिरिया व कोरियन कलह. त्यामुळे सोन्याच्या दरात घट होत गेली. जगातील केंद्रीय बँका सुरक्षा म्हणून सोने राखीव कोटा ठेवतात. व्यापारावर याचा परिणाम झाला. डॉलरचे युरोपच्या बदल्यात वाढते मूल्यांकन लक्षात घेता ब-याच युरोपीय राष्ट्रांनी डॉलरचे महत्त्व कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सोन्याची विक्री करण्यात आली.
*याशिवाय गोल्डमन शॅचेसोबत अन्य विश्लेषकांनी सोने विकण्याच्या पर्यायामुळे तसेच अमेरिकेतील गोल्ड इक्विटीएफचे नियंत्रण कमी करण्यात आल्याने सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.
सोन्याच्या किमती सद्य:स्थितीला जरी खाली आल्या असल्या तरी भविष्यात किमती या नवीन भरारी घेतील हे नक्की, तोपर्यंत सर्वसाधारण गुंतवणूकदाराने सावध पवित्रा घेत प्रत्येक नीचांकाला सोने विकत घेत जावे.

फाउंडर व सीईओ - वेल्थ प्रेनिअर्स
devendra.pandit@wealthpreneurs.co.in