आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यातील घसरण सुरूच, तोळ्यामागे 200 रुपयांनी घसरून 27,500

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक कल आणि घटलेली मागणी याचा फटका गुरुवारी मौल्यवान पिवळ्या धातूला बसला. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे 200 रुपयांनी घसरून 27,500 झाले. चांदी किलोमागे 500 रुपयांनी स्वस्त होऊन 40,500 झाली.
सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, जगातील प्रमुख सराफ्यातील घसरणीचा कल आणि देशातील बाजारात ज्वेलर्सकडून घटलेली मागणी यामुळे सोन्याची झळाळी फिकी पडत आहे. जागतिक सराफा बाजारात सोने 16 आठवड्यांच्या नीचांकावर आले आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने सोन्याची चमक घटत आहे. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे 0.5 टक्क्यांनी घटून 1251.86 डॉलर झाले.
देशातील सराफा बाजारात मागील तीन सत्रांत सोने तोळ्यामागे 620 रुपयांनी स्वस्त झाले आहे.