नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक कल आणि देशात स्टॉकिस्टांनी केलेली जोरदार विक्री याचा फटका गुरुवारी सोन्याच्या किमतीला बसला. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 100 रुपयांनी घसरून 28,400 झाले. औद्योगिक क्षेत्राकडून चांगली मागणी आल्याने चांदी मात्र तेजीने चकाकली. चांदी किलोमागे 100 रुपयांनी वाढून 44,900 झाली.
सराफा व्यापार्यांनी सांगितले, जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेतील बेरोजगारविषयक आकडेवारीकडे लागले आहे. त्यामुळे सराफा बाजारात सतर्कतेसह नकारात्मक कल दिसून आला. त्यातच देशातील स्टॉकिस्टांनी सोने विक्रीवर भर दिल्याने सोने घसरले.