आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत सोन्याला झळाळी , तोळ्यामागे ६५० रुपयांची तेजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळीपासून घसरणीच्या मा-याने काळवंडलेल्या सोन्यात शनिवारी तेजीची झळाळी आली. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे ६५० रुपयांनी वाढून २६४५० पर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे २० जूननंतर प्रथमच सोन्याने एका दिवसात एवढी मोठी उसळी घेतली.

दिवाळीनंतर सातत्याने घसरण अनुभवणा-या सोन्याला खालच्या पातळीवर चांगली मागणी आल्याने सोन्याच्या किमती वधारल्याचे सराफा व्यापा-यांनी सांगितले. चांगली मागणी आल्याने चांदीही किलोमागे ६५० रुपयांनी वाढून ३५,५५० झाली. जागतिक सराफा बाजारातही सोने वधारले. न्यूयॉर्क सराफ्यात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) २.४ टक्क्यांनी वाढून ११६९.८० डॉलरवर पोहोचले. सोन्याचा हा साडेचार महिन्यांतील उच्चांकी स्तर आहे.