आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gold Price Go Up In The Festivel Season, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सणांमुळे सोने तेजीने चकाकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात आता सणांच्या हंगामाला सुरुवात झाली असून त्यानंतर लग्नसराई आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली आहे. परिणामी शुक्रवारी सोने तेजीने चकाकले. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे ५९० रुपयांनी वाढून २७,५५० झाले.
ही सोन्याने नोंदवलेली यंदाची एका दिवसातील दुसरी सर्वात मोठी तेजी आहे. पितृपक्षात काळवंडलेला मौल्यवान धातू आता ऐन सणासुदीत तेजीने झळाळणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

तेजीची कारणे
* नवरात्र उत्सव - देशात सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. या काळात सोन्याचे दागिने करेदी करणे शुभ मानले जाते.
* सणांचा हंगाम - नवरात्रा-पाठोपाठ दसरा, त्यानंतर दिवाळी असे मोठे सण आहेत. या काळात सोन्याला चांगली मागणी असते.
* पितृपक्षाची समाप्ती - पितृपक्षात सोने, चांदी, दागिने तसेच नवीन खरेदी अशुभ मानली जाते. आता पितृपक्ष संपल्याने मौल्यवान धातूची खरेदी सुरू झाली आहे.