आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने चकाकले, रुपया वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई| नवी दिल्ली - निर्यातदारांनी केलेल्या जोरदार डॉलर विक्रीमुळे सोमवारी रुपयाला चांगले बळ मिळाले. डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी वधारून ६१.७१ वर पोहोचला. हा रुपयाचा दोन महिन्यांतील उच्चांक आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे १०० रुपयांनी चकाकून २८,०८० झाले. दिल्लीत चार महिन्यांनंतर सोने २८ हजारांच्या पातळीत पोहोचले. चांदी किलोमागे ४५० रुपयांनी घसरून ३९,१०० झाली.

सराफा व्यापा-यांनी सांगितले, सध्या सुरू असलेली लग्नसराई त्यामुळे ज्वेलर्स व रिटेलर्सकडून आलेली जोरदार मागणी आणि जगातील सराफा बाजारातील सकारात्मक कल यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. न्यूयॉर्क सराफ्यात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) १.४० टक्क्यांनी वाढून १२८०.३० डॉलर झाले. दिल्लीच्या सराफ्यात आलेल्या तेजीमुळे सोने तोळ्यामागे २८ हजारांच्या पार गेले आहे. चार महिन्यांनंतर सोने २८ हजारांच्या पातळीत पोहोचले आहे.

रुपयाचा उच्चांक
विदेशी मुद्रा विनिमय बाजारात निर्यातदारांनी केलेल्या जोरदार डॉलर विक्रीमुळे सोमवारी रुपयाला चांगले बळ मिळाले. डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी वधारून ६१.७१ वर पोहोचला. हा रुपयाचा दोन महिन्यांतील उच्चांक असल्याचे वितरकांनी सांगितले.