आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने खरेदी करणा-यांसाठी आणखी 'अच्छे दिन', दर आले 27000 पेक्षाही खाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोन्याच्या दरांमध्ये होणारी घसरण आजही कायम आहे. एमसीएक्स वर सोन्याच्या वायदे बाजारात 0.50 टक्के घसरण आल्याने सोने 26,825 रुपए तोळ्यावर पोहचले आहे. काल एमसीएक्सव सोन्यामध्ये वर्षातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

काल सोने 509 रुपयांच्या घसरणीवर बंद होत 26958 च्या पातळीवर पोहोचले होते. या संपूर्ण महिन्यामध्ये सोन्याचे दर 2000 पेक्षाही अधिक घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने साडेतीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञांच्या मते आज सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. कोटक कमोडिटीचे धर्मेश भाटिया यांच्या मते आज सोने 26,600 रुपये प्रतितोळा या दरापर्यंत खाली येऊ शकते.

अंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
कॉमेक्सवर काल सोने अमेरिकन मॅन्युफॅक्चर्ड गुड्स ऑर्डर च्या चांगल्या व्यवसायामुळे 1265 डॉलर खाली घसरले होते. हा गेल्या साडेतीन महिन्यांचा नीचांक होता.
घसरणीचे कारण ?
अमेरिकेमध्ये एप्रिल महिन्यात मॅन्युफॅक्चर्ड गुड्सचा व्यवसाय अपेक्षेपेक्षाही चांगला ठरला. 2008 नंतर बाद कंझ्यूमर कॉन्फिडेंस एका वेगळ्या पातळीवर पोहोचला आहे.
मार्च महिन्यांत घरांच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. तसेच अमेरिकेचे आकडेही चांगले आल्यामुळे बाँड खरेदी प्रोग्राममध्ये लवकरच कपात केली जाण्याची शक्यता वाढली आहे.
तसेच युरोझोनमध्ये घटलेली महागाई आणि कमी झालेले कर्ज पाहता पुढील आठवड्यात युरोपीयन सेंट्रल बँकेच्या दरांमध्ये कपात होऊ शकते. त्यामुळेच कॉमेक्सवर सोन्याचा दर साडेतीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहे.