आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच महिन्यांनंतर सोने 30 हजारांखाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत आणि साठेबाजांकडून झालेली विक्री याचा फटका मंगळवारी सोन्याच्या किमतीला बसला. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 350 रुपयांनी घसरून 29,850 झाले. नऊ आठवड्यांनंतर प्रथमच सोने 30 हजारांखाली आले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढल्याने सोन्याची आयात स्वस्त झाली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसून येत असल्याचे सराफा व्यापार्‍यांनी सांगितले. चांदी किलोमागे 350 रुपयांनी स्वस्त होऊन 44,200 झाली.

सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, अमेरिका फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्याने सराफा बाजारात दबाब दिसून येत आहे. जागतिक सराफा बाजारात सोने 13 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. न्यूयॉर्क सराफा बाजारात सोने औंसमागे (28.34 ग्रॅम) 1.9 टक्क्यांनी घसरून 1311.10 डॉलर झाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढत असल्याने मौल्यवान धातूंची आयात स्वस्त झाल्याचा परिणामही सोने व चांदीच्या किमतीवर होत आहे.

घसरणीचा आठवडा
सोने आणि चांदीच्या बाबतीत मागील सात सत्रे घसरणीची राहिली. मागील आठवड्यात सोने तोळ्यामागे 875 रुपयांनी, तर चांदी किलोमागे 2,250 रुपयांनी स्वस्त झाली आहे.