आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

' सोन्यातील घसरणीचा कर्जावर परिणाम नाही '

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सध्या सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर देशातील सुवर्ण कर्ज देणा-या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणा-या असोसिएशन ऑफ गोल्ड लोन कंपनीज या संस्थेने सुवर्ण कर्जाचा कमाल व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिग्रॅम सोन्यावर दिलेल्या रकमेत घट झालेली असली तरी सोन्यावरील कर्जाला मोठी मागणी आहे. परंतु सोन्याच्या किमतीत 15 ते 20 टक्के चढ-उतार झाला तरी त्याचा सुवर्ण कंपन्यांच्या व्यवसायावर तसेच कर्जदाराच्या परतफेडीवर परिणाम होऊ शकतो असा गैरसमज करू नये, असे मत या संस्थेने व्यक्त केले आहे.
सुवर्ण कर्ज कंपन्या बहुतांश कर्जे घरातील सोन्याच्या दागिन्यांवर देतात आणि त्यावर अशा तात्पुरत्या चढ-उताराचा व्यवसायावर होणारा परिणाम अल्प कालावधीसाठी असतो. त्याचप्रमाणे कर्ज वितरणाच्या तुलनेत अनुत्पादित कर्जाचे प्रमाण कमी असते, असे मत असोसिएशनचे अध्यक्ष आणि मुथूट फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अलेक्झांडर मुथूट यांनी व्यक्त केले.