आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will You Buy Gold In 2015 As Prices Projected To Come Down?

वर्ष २०१५ मध्ये सोन्याच्या किमती येणार तोळ्यामागे २५ हजारांखाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेअर बाजाराने सरलेल्या २०१४ या वर्षात शानदार परतावा दिला, मात्र अडचणीच्या काळात चकाकणारे सोने या वेळी मात्र फिके राहिले. वायदा बाजारात वर्षभरात सोन्याच्या किमती सुमारे ५ टक्क्यांनी घसरल्या, तर किरकोळ बाजारात ग्राहकांना भलेही दागिने स्वस्त मिळाले असले तरी गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणार्‍यांच्या पदरी मात्र निराशा आली.

सरलेल्या वर्षाप्रमाणेच २०१५ मध्येही सोन्यातील घसरणीचा कल सुरूच राहील, असे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेची सुधारणारी अर्थव्यवस्था आणि डॉलरचे वाढते मूल्य यामुळे सोन्यात घट राहील, असा तर्क तज्ज्ञांनी सांगितला. असे असले तरी जगातील अनेक बड्या अर्थव्यवस्थांची डळमळीत स्थिती सोन्याच्या किमतीला काही प्रमाणात आधार देण्याची शक्यता आहे. मात्र, हा आधार किती मजबूत राहील याबद्दल तज्ज्ञ साशंक आहेत.

सोने किमतीची कक्षा
- कोटक कमोडिटी : मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) सोने तोळ्यामागे २५,००० ते २९,००० रुपयांदरम्यान राहील, तर कॉमेक्स बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ११०० ते १४०० डॉलरच्या दरम्यान राहील.
- एंजेल ब्रोकिंग : एमसीएक्सवर सोने तोळ्यामागे २४,४०० ते २९,००० रुपयांदरम्यान राहील, तर कॉमेक्स बाजारात सोने औंसमागे १०९० ते १३४० डॉलरच्या दरम्यान राहील.
- केडिया कमोडिटी : २०१५ मध्ये सोने तोळ्यामागे २२,००० ते ३०,००० या कक्षेत राहण्याची शक्यता आहे.

तर सोने महागणार
- युरोपातील बड्या अर्थव्यवस्थांवर मंदीचे मळभ दाटते आहे, त्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीकडे कल वाढू शकतो, तर आशियातील जपान आणि चीनमध्ये विकासदर मंदावला आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.
- याशिवाय २०१४ प्रमाणे आखातातील राजकीय संकट वाढले, तर सोने पूर्वीप्रमाणे चकाकण्याची शक्यता आहे. मात्र, या तेजीतही देशात सोने तोळ्यामागे ३० हजारांवर जाण्याबाबत साशंकता आहे.

तज्ज्ञांचा सल्ला
- एंजल ब्रोकिंगच्या नवीन माथूर यांच्या मते, जगभरातील केंद्रीय बँकाच्या नाणेनिधी धोरणावर सोन्याच्या किमती अवलंबून असतील. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड ईटीएफ एसपीडीआरकडील साठा ६ वर्षांच्या नीचांकावर आला आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कल कमजोर आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमतीत अल्पकाळात तेजीची शक्यता नाही.
- माथूर यांच्या मते कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतीमुळे जगभरात महागाईची भीती कमी झाली आहे. महागाई घटल्याने हेजसाठी सोन्याच्या वापर करणारे फंड व्यवस्थापकांचा ओढा सोन्याकडे राहील, त्यामुळे कल सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे.
- केडिया कमोडिटीचे अजय केडिया यांच्या मते, सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक चांगला परतावा देईल.