आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Prices Today: Modest Recovery After Massive Drop Off

सोन्यातील घसरण मंदावली...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, दिल्ली- जागतिक घडोमोडीने घसरणीच्या वाटेवर लागलेल्या सोने व चांदी या मौल्यवान धातूंची घसरण बुधवारीही सुरूच राहिली. मुंबई सराफ्यात सोने तोळ्यामागे 220 रुपयांनी घसरून 25,820 रुपये या 20 महिन्यांच्या नीचांकी पातळीपर्यंत खाली आले. चांदीच्या किमती किलोमागे 875 रुपयांनी स्वस्त होऊन 45,485 रुपयांवर आली.आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक संकेताचा फटका सोने व चांदीला बसत असल्याचे मुंबईतील सराफा व्यापा-यांनी सांगितले. दिल्ली सराफा बाजारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. येथे सोने तोळ्यामागे 90 रुपयांनी घसरले व 26,350 रुपयांवर आले. चांदीतही किलोमागे 425 रुपयांची घट होऊन 45,700 रुपयांची पातळीवर आली. औरंगाबादेत सोने तोळ्यामागे 300 रुपयांनी वधारुन 27000 रुपये झाले.

युरोपात सोने औंसला 1383.15 डॉलर या पातळीवर, तर चांदी 23.39 डॉलर प्रतिऔंस या पातळीवर होती. आर्थिक संकटात सापडलेल्या सायप्रसने सोन्याचा साठा विक्रीत काढल्याच्या वृत्ताने पाडव्यापासून सोन्याच्या किमती घसरण्यास सुरुवात झाली. त्यातच कोरिया द्वीपकल्पातील युद्धजन्य परिस्थितीने गुंतवणूकदारांची मानसिकता विक्रीकडे झुकवली. त्यानंतर सोने-चांदीच्या विक्रीचा सपाटा गुंतवणूकदारांनी लावला. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूची मोठ्या प्रमाणात घसरण झाली. देशातील सराफा बाजारात त्याचे पडसाद उमटले आणि सोने पाच दिवसांत तोळ्यामागे 3500 ते 4500 हजार रुपयांनी स्वस्त झाले.