आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अनेकांनी साधली सोने खरेदीची सोनेरी संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सोन्याचे भाव गेल्या दोन दिवसांत सुमारे साडेचार ते पाच हजार रुपयांनी खाली आल्याने सराफ मंडळी जरा धास्तावली असली तरी ग्राहकराजा मात्र सोन्याच्या खरेदीची ही सुवर्णसंधी साधण्यात गर्क असल्याचे चित्र आहे. पुण्यातल्या सराफी बाजारात मंगळवारी जणू पाडवाच साजरा झाला, अशी प्रतिक्रिया पु. ना. गाडगीळ सराफचे भागीदार सौरभ गाडगीळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

गेल्या दोन दिवसांपासून विविध माध्यमांतून सोने स्वस्त झाल्याच्या बातम्या सातत्याने येत असल्याने ग्राहकांची कमी किमतीत सोने खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. पुण्यात तर प्रमुख पेढ्यांसमोर सोने खरेदीसाठी रांगा लागल्याचेही चित्र दिसत होते. सोन्याचा सोमवारचा भाव 25 हजार 300 रुपये होता. त्यात मंगळवारी वाढ झाली आणि तो दिवसअखेर 26 हजार 500 वर स्थिरावला, असे सौरभ गाडगीळ म्हणाले.मंदीच्या स्थितीमुळे काही प्रमुख कंपन्यांनी युरोपियन युनियनकडे स्वत:चे सुवर्णसाठे विक्रीला काढण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. केवळ या प्रस्तावांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीत हे फेरफार दिसत आहेत.