आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या दरात घसरण सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोन्याच्या दरात गुरुवारीही घसरण नोंदवण्यात आली. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सने सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. मुंबईतील सराफा बाजारात स्टँडर्ड सोन्याच्या दरात 60 रुपयांनी घसरण होऊन ते प्रतितोळा 29,140 रुपयांवर आले. प्युअर गोल्डमध्येही 50 रुपये घटून ते प्रतितोळा 29,200 रुपयांवर पोहोचले. चांदीचे दर प्रतिकिलो 325 रुपयांनी घटून 52,345 रुपयांवर आले. औरंगाबाद सराफा बाजारातही घसरणीचा कल कायम राहिला. सोन्याचे दर प्रतितोळा 130 रुपयांनी घटून 29,770 रुपयांवर आले.