आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याच्या दरांमध्ये आज तिसर्‍या दिवशीही घट, सोने प्रति तोळा 27,920

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: सोन्याच्या दरांमध्ये सुरू असलेली घसरण आजुनही सुरूच आहे. दिल्ली समवेत मुंबईतही सोन्याच्या दरांमध्ये चांगलीच घसरण झाल्याचे आज अढळून आले. मुंबईत सोने प्रति तोळा (दहा ग्रॅम) 27,920 रुपये इतक्या खाली उतरले आहे. या घसरणीसोबतच 22 कॅरेट सोने प्रतितोळा 26100 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर 27,920 रुपये इतके झाले आहेत.

सध्या सुरु असलेल्या सणउत्सवाच्या दिवसातही सोन्याच्या मागणीत घट पहायला मिळत आहे. त्यामुळे याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे दर 155 रुपयांनी कमी होत 28,200 रुपये प्रति तोळा एवढे झाले आहेत. या आठवड्यात सोन्याची ही सर्वात निच्चांकी पातळी असल्याचेही बोलले जात आहे. जागतिक बाजारपेठेत आलेल्या मंदीमुळे सोन्याची माणणी कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरांमध्येही घट झाली असून चांदीचे दर प्रति किलो 42, 700 रुपये एवढे खाली आले आहेत.