आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यात विक्रमी घसरण; भविष्यात भाव आणखी गडगडणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नवी दिल्ली- सोन्याचा भाव सोमवारी आणखी पाचशे रूपयांनी घसरला. सोन्याचा भाव शनिवारी तोळ्यामागे 1250 रुपयांनी घसरला होता. गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याच्या भावात घसरण कायम असल्यामुळे सोनं 27 हजारी झाले आहे. मुंबईत सोन्याचा भाव प्रतितोळा 27 हजार 200 इतका खाली आला आहे.

परदेशी बाजारातील घसरणीचा फायदा घेत साठेबाजांनी केलेल्या विक्रीमुळे दिल्लीत सोने 28 हजार 300 रुपयांवर तर चांदी 51 हजार 100 रुपये किलोवर आली. जाणकारांच्या मते सोन्याचे भाव पुढील काही काळात आणखी गडगडण्याची चिन्हे आहेत.

सोन्याच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोन्याच्या भावात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे

ग्राहकांना दिलासा: लग्नसराईच्या तोंडावरच सोने घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी तो तात्पुरता असून दोनच दिवस हा कल राहू शकतो. त्यामुळे सोने खरेदीची हीच सुवर्णसंधी असल्याचे मत सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. नंतर सोने 2000 तर चांदी 5 हजार रुपयांनी वधारू शकते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.